न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा आज मंगळवार (दि. २९) रोजी सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील विकासकामांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
स्थायीची थोडक्यात डबल सेंचुरीची संधी हुकली असून, १९१ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकासकामांना यावेळी मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी चऱ्होली परिसरातील रस्ता विकसित करणेकामी ४१ कोटी ७७ लाख रुपये, वृक्ष प्राधिकरण समितीच्या अर्थसंकल्पापोटी २८ कोटी रुपये तर मोशी येथील रस्त्यासाठी १२ कोटी १६ लाख रुपये, या व अशा इतर कामांसाठी एकूण १९१ कोटी ७६ लाख रुपयांच्या विकासकामांना स्थायीने मंजुरी दिली आहे.
भाजपच्या सदस्यांना स्थायी समिती वर्षभरासाठीच मिळणार आहे. तर, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक फेब्रुवारी अखेर नियमानुसार समितीच्या बाहेर पडणार आहेत. त्यामुळे स्थायीने रेकोर्डब्रेक विकासकामांचा सपाटा चालूच ठेवला आहे.











