न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २९ जाने.) :- चिंचवड स्टेशन येथील रेल्वे स्थानकावर आज मंगळवार (दि. २९) रोजी दुपारी दीड वाजता मॉकड्रील अभियान राबविण्यात आले. यावेळी या घटनेचा थरार अनुभविण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी जमली होती.
आतंकवादी चिंचवड रेल्वे स्थानकातील लोकलमध्ये घुसले, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली व अल्पावधीतच सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रेल्वे स्थानकाचा ताबा घेतला. त्यांच्याबरोबर बॉम्ब शोधक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहीका असा सर्व लवाजमाही घटनेस्थळी दाखल झाला.
क्षणार्धात जवानांनी दोन आतंकवाद्यांना यमसदनी धाडले. सुरुवातीला बघ्यांना हा प्रकार खरा वाटला, परंतु हा मॉकड्रील असल्याचा प्रकार नंतर बघ्यांच्या लक्षात आला.











