न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींसाठी वसतिगृह सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असल्याचे सर्वांनाच परिचीत आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर देखील शैक्षणिक क्षेञात अग्रगन्य आहेच. पिपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण राज्यातुन अखंड बारा-बलुतेदार समाजबांधव नोकरीकरीता व शालेय शिक्षणासाठी येत असतात. या अखंड बारा-बलुतेदार तसेच बहुजन समाज बांधवाच्या शालेय विद्यार्थिनींना अभ्यासासाठी पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी कुंचबना होत आहे.’
मुख्यमंत्र्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन, शहरातील बहुजन समाजातील तसेच अखंड बारा-बलुतेदार समाजातील विद्यार्थिनींसाठी स्वतंञ शालेय वसतीगृहाच्या (हॉस्टेल) उभारणीसाठी, समाजकल्याण विभागाला तशा सूचना द्याव्यात व २१ दिवसाच्या आत त्याबाबत कार्यवाही करावी. अन्यथा शहरातील विद्यार्थिनींची मोट बांधून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दाखले यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त कार्यालय व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या सहकार्याने शहरात नाममात्र दरात भूखंड उपलब्ध करून दिल्यास, याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन, वसतिगृह उभारण्यात येईल.
– दिनेश वाघमारे
प्रधान सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)











