न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- जुनी सांगवी येथे छावा मराठा संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष मयूर पांगारकर, पुणे जिल्हा अध्यक्ष व कोकण विभाग संपर्क प्रमुख रामभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कला क्षेत्रातील पदाधिकार्यांनी छावा मराठा संघटनेत प्रवेश केला.
यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन गवांडे पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष नितीन पवार, शरद देशमुख, दिनेश पवार, अमोल पवार, रमेश जाधव, लिनेश घाडगे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाध्यक्षपदी चित्रपट लेखक, दिग्दर्शक नितेश पवार, उपाध्यक्षपदी नितीन पाटील आणि अविनाश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नितेश पवार यांनी कार्यकर्त्यांसह संघटनेत प्रवेश केला.
राम जाधव नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, समाजात होणारे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारा विरोधात पदाधिकाऱ्यांनी आवाज उठविला पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले पाहिजे.
सूत्रसंचालन सचिन गवांडे पाटील यांनी, तर आभार रामभाऊ जाधव यांनी मानले.











