न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचे संक्रमण वाढून रुग्णसंख्या वाढल्याने पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. संक्रमण कमी झाल्यानंतर निवडणूक घेण्यात येणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.
कर्मचारी महासंघाच्या सन २०२२ ते २०२४ च्या निवडणुकीसाठी २१ जानेवारीला मतदान घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या विविध पॅनेलच्या उमेदवारांनी महापालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालयात प्रचार सुरू केला होता. मात्र, शहरात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने निवडणूक विभागाने ही निवडणूक रद्द केली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर होईपर्यंत तसेच शासनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर निवडणुकीचा पुढील कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी सांगितले.











