- शहरातील रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरातील महत्त्वाची ब्लड बँक असलेल्या वायसीएमच्या रक्तपेढीत केवळ सात दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहरातील तरुणांनी रक्तदान करून रुणांचे प्राण वाचविण्यास मदत करावी, असे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.
वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीकडे दिवसाला ६० ते ७० रक्ताच्या पिशव्यांची मागणी होत आहे. परंतु सद्यःस्थितीत उपलब्ध असलेला रक्ताचा साठा आणि दात्यांची संख्या पाहता रक्तपेढीला ५० पिशव्या रक्त व अन्य घटकांचे वाटप करणे शक्य होत आहे. वायसीएम रक्तपेढीत शहराबरोबरच जिल्ह्यातून रुग्ण येथे रक्त आणि संबंधित घटक घेण्यासाठी येत असतात. साधारण दिवसाला ६० ते ७० रक्त पिशव्यांची मागणी होत आहे.
मागील आठवड्यात तीन रक्तदान शिबिरे घेतल्याने काही प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आम्ही सध्या ५० पिशव्या रक्त देऊ शकतो. पुढील सात दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. आगामी काळात रक्तदात्यांनी पुढे येत करोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान करावे.
– डॉ. शंकर मोसलगी, वायसीएम रक्तपेढी…











