- शहरातील रस्त्यांची योग्यता आणि राहणीमानावर भर – महापौर ढोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या अतिक्रमित रस्ते नागरिकांसाठी खुले होण्यासाठी सन २०२० मध्ये ‘स्ट्रीट फोर पीपल्स चॉलेंजेस’ हा उपक्रम राबविला. त्यात देशातील ११३ शहरांमधून पहिल्या अकरा शहरांत पिंपरी – चिंचवडचा समावेश झाला आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशपातळीवर ही संकल्पना राबविली होती.
शहरे ही लोकांसाठी आहेत. स्वत:च्या शहराची रचना करताना नागरिकांचा सहभाग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने डिझाईन स्पर्धा, व्यावसायिक दृष्टिकोन, विद्यार्थी आणि इतर संस्थांचा समावेश करून घेत सर्जनशील उपाय विकसित करणे आणि त्याची चाचणी घेणे, लोकांचे मते ऐकणे तसेच त्यांच्या समस्या समजून त्यावर मार्ग काढणे असा या उपक्रमाचा उद्देश होता. देशभरात या योजनेद्वारे १५० हून अधिक शहरात मोहिमा राबविण्यात आल्या.
सर्वोच्च ११ पुरस्कार प्राप्त शहरे…
सर्वोच्च ११ पुरस्कार प्राप्त शहरांमध्ये पिंपरी – चिंचवड, औरंगाबाद, बेंगळुरू, गुरुग्राम, कोची, कोहिमा, नागपूर, पुणे, उदयपूर, उज्जैन, विजयवाडा या शहरांची निवड केली आहे. तसेच इंफाळ कर्नाल, सिल्वासा, वडोदरा या शहरांची विशेष कामगिरीबाबत निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात स्पर्धेत सहभागी शहरांनी हेल्दी स्ट्रीट्सचे शहरव्यापी नेटवर्क तयार करण्याच्या दृष्टिकोनातून काय काम केले. मोकळ्या सार्वजनिक जागा, मनोरंजन आणि मानसिक आरोग्यासाठी तातडीची गरज लक्षात घेऊन लोकांसाठी रस्ते विकसित केले आहेत का? या योजनेमध्ये चालणे आणि प्लेसमेकिंग उपक्रमांचा विस्तार करणे आणि कायमस्वरूपी पायाभूत सुविधांमध्ये रूपांतर करणे ही बाब समाविष्ठ होती.
नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अग्रणी असलेल्या, पिंपरी चिंचवड शहराने स्ट्रीट डिझाईन करून शहरव्यापी हरित सेतू मास्टरप्लॅन पुढे नेण्यासाठी काम केले आहे. स्वतंत्र सायकल लेन आणि फूटपाथ तयार करून विविध रंगरंगोटीद्वारे नागरिकांसाठी रस्ते खुले केले. स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठिकाणी अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते व फूटपाथ तयार करण्यात येत आहे.
– राजेश पाटील, आयुक्त…शहरांमधील रस्त्यांची चालण्याजोगी योग्यता आणि राहणीमान यावर लक्ष केंद्रित केले. शहरे आर्थिक आणि सामाजिक कल्याण पुनर्प्राप्त करू शकतात, असे या उपक्रमातून निदर्शनास आले आहे. प्रस्ताव सादर केलेल्या ३८ शहरांपैकी १५ शहरे अनुकरणीय नेतृत्व, सर्जनशील ऑन – ग्राऊंड परिवर्तन आणि नागरिकांसह व्यापक सहकार्याचे प्रदर्शन करण्यासाठी म्हणून निवडली गेली.
– उषा ढोरे, महापौर…












