न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे निलख (दि. ३० जाने.) :- पिंपळे निलख येथील आरक्षण क्र. ३७४ येथे नव्याने विकसित होत असलेल्या उद्यानाच्या कामाची नगरसेविका आरती चोंधे यांनी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
यावेळी नगरसेविका आरती चोंधे, पवन कामठे, उद्यान स्थापत्य अधिकारी भगवानराव मोरे आणि बीव्हिजी ग्रुपचे अधिकारी उपस्थीत होते. चोंधे यांनी यावेळी उद्यानातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच कामाचा दर्जा व गुणवत्ता याबाबत कोणतीही तडजोड न करता काम करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.











