न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- घरासमोरील मोकळ्या मैदानात फिर्यादी नातेवाईक मित्रांसोबत नाचत होते. त्यावेळी त्यांच्या भावकीतील दुरचा नातेवाईक आरोपी तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे पार्टी मागितली. मात्र, फिर्यादी यांनी पार्टी देण्यास नकार दिल्याने त्याने लोखंड़ी कोयत्याने त्यांच्यावर वार केला.
या हल्ल्यात फिर्यादी यांच्या डोक्याला इजा झाली आहे. हा प्रकार देहूगावातील चव्हाणनगर येथे बुधवारी (दि. १९) रोजी घडला. निखिल नंदनराज चव्हाण (वय ३२, रा. देहूगाव) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि. २०) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश चंद्रकांत पाटोळे (वय २८, रा. देहूगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















