न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- मॉल्स, हॉटेल्ससह सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना लसीकरणाचे दोन डोस अनिर्वाय केले आहेत. पीएमपीने प्रवास करताना प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. अन्यथा पीएमपीतून प्रवाशांना खाली उतरावे लागणार आहे. त्याची कार्यवांही ‘ पीएमपी ‘ ने सुरू केली आहे.
रेल्वे, एसटी, पीएमपीमध्ये प्रवास करताना ते जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही डोस घेतले नसलेल्यांना वाहकांकडून तिकीट मिळणार नाही. तूर्तास १८ वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडून २०० बसच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. निर्बंध आणि रात्रीची संचारबंदी यामुळे त्या घटविण्यात आल्या आहेत. तर, पिंपरी चिंचचवड शहरात धावणाऱ्या ५० बस कमी केल्या आहेत.
“प्रवाशांना तिकीट काढण्यापूर्वी दोन डोसचे प्रमाणपत्र वाहकाला दाखवणे अनिवार्य आहे. अन्यथा त्याला प्रवास करता येणार नाही. तशा स्वरूपाच्या सूचना वाहकांना देण्यात आल्या आहेत”.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी…


















