न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालय सुरू होणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले. काल एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीने उच्चांक केला आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले सर्वांना विचारात घेऊन सर्व निर्णय घेतले जात आहेत. अजून किमान आठ दिवस तरी पुण्यात लाट कमी होणार नाही, ती अजून वाढतेय. पुण्याचा कोरोना दर २७ टक्के आहे. त्यामुळे अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत.
कोरोना संख्या वाढत असले तरी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्व बेड आहेत पण रुग्ण ऍडमिट नाहीत, सगळे हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहेत, रुग्णांना त्रास होऊ देणार नाही. खाजगी हॉस्पिटलच्या तक्रार येत आहेत.