न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाने आज वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील १८ पत्राशेड व १२ अनधिकृत टपऱ्या हटविण्याची कारवाई केली.
सकाळी अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. ‘क’ प्रभाग अंतर्गत १) खंडेवस्ती चौक, इंद्रायणी नगर (२) मोई चौक, जाधववाडी – कुळवाडी (३) जय गणेश साम्राज्य चौक, इंद्रायणीनगर येथील १२ टपऱ्या, १८ अनधिकृत पत्राशेड, ६ हातगाड्या वर अतिक्रमणची कारवाई करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे, बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, दिपाली जगदाळे, अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.