- पाच डझनाच्या पेटीला तब्बल १८ हजारांचा भाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२२) :- फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या देवगड हापूस आंब्याची हंगामातील पहिली पेटी आज गुलटेकडी मार्केटयार्डात दाखल झाली. यंदा प्रथमच शेतकऱ्या समोर झालेल्या लिलावात पाच डझनाच्या एका पेटीला तब्बल १८ हजार रूपयांचा भाव मिळाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुमकेश्वर कातवण गावातील शेतकरी रामभाऊ सावंत यांच्या बागेतून मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापू भोसले यांच्या ‘मे. नामदेव रामचंद्र भोसले अॅन्ड सन्स’ या फर्मवर हापूस आंब्याची आवक झाली. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड आणि शेतकरी चेतन सावंत यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पुजन झाले.
यंदा फळधारणा चांगली आहे. थंडी जास्त नसल्याने फळगळती कमी झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पादन चांगले होईल. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आंब्याचा हंगाम नियमित सुरू होईल, असे देवगड येथील शेतकरी चेतन रामभाऊ सावंत म्हणाले. आंब्याचा लिलाव शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पुणे बाजार समितीत आंब्याची मोठी लाढाल होत असते. यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, यादृष्टीने आवश्यक ते सहकार्य केले जाईल.