- तडीपार आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की; पिंपरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२२) :- दोन वर्षांसाठी आरोपीला हद्दपार करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करून आरोपी हा शहरात वावरत होता. तसेच लोखंडी कोयता बाळगत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले.
त्यावेळी आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की केली. तुम्ही चूक करताय माझी वेळ आल्यावर दाखवतो मी कोण आहे ते, असे बोलून धमकी देऊन आरोपी पोलिसांच्या अंगावर गेला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून कोयता जप्त केला.
वैभवनगर, पिंपरीगाव येथे शनिवारी (दि. २२) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय २८, रा. मिलिंदनगर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक गणेश करपे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


















