- अज्ञात इसमांच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२२) :- अनोळखी आरोपींनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांच्या व्हाट्स प्रोफाइलचा फोटो वापरून खोटे व्हाट्सअप प्रोफाइल बनवले. त्याद्वारे संतोष जाधव यांच्याशी आरोपींनी चॅटिंग केले.
नगरसेवक अजित गव्हाणे, अंबरनाथ कांबळे, लक्ष्मण सस्ते यांना आरोपींनी व्हाट्सअप कॉल केला. त्यावर पालिका आयुक्तांचा हुबेहूब आवाज काढून अमेझॉन गिफ्ट कार्डद्वारे आर्थिक मदतीची मागणी केली. हा प्रकार १७ जानेवारी २०२२ ते १८ जानेवारी २०२२ या कालावधीत घडला.
नीलकंठ धोंडीराम पोमण (वय ५४, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २२) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलचे पोलीस निरीक्षक डाॅ. संजय तुंगार तपास करीत आहेत.
















