न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२२) :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखेचा नामफलक उद्घाटन समारंभ रविवार (दि. २३) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डि-मार्ट जवळ काळेवाडी येथे संपन्न झाला.
या ठिकाणी शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली व आठवणीला उजाळा दिला. या कार्यक्रमाचे नियोजन उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते व शिवसेना काळेवाडी राहटणीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना अधिकारी पिंपरी चिंचवड कु. विश्वजीत बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, दिलीप भोंडवे, शहराध्यक्ष अल्पसंख्यांक सेल दस्तगीरभाई मणियार, अधिक राव भोसले, ओंकार मुळे, प्रहारचे संजय गायखे, विकास काजवे, मातोश्री सामाजिक संस्था अध्यक्ष गणेशशेठ आहेर, चिंचवड विधानसभा सहसंघटिका शारदा वाघमोडे, सौ. सुजाता हरेश नखाते, तस्लिम शेख, गोरख पाटील – शिवसेना विभागप्रमुख काळेवाडी, प्रदिप दळवी – शिवसेना विभागप्रमुख श्रीनगर रहाटणी, अंकुश कोळेकर – विभाग संघटक रहाटणी श्रीनगर, गणेश वायभट – विभाग संघटक काळेवाडी, सागर शिंदे – उपविभागप्रमुख काळेवाडी, अनिल पालांडे – उपविभागप्रमुख काळेवाडी, तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.


















