- पिल्लांना पुन्हा त्याच जागी सोडणार असल्याची वन अधिकाऱ्यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२२) :- नेरे गावठाण परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत. सोमवार (दि.२४) रोजी सकाळी सातच्या सुमारास नेरे गावठाण येथील सीताई बंधाऱ्या जवळील मोहन जाधव, राहुल जाधव यांच्या उसाच्या शेतात बिबट्याची तीन मादी पिल्ले आढळून आली.
जाधव यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार पौड वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपनर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ गणेश सोरटे यांनी घटना स्थळी तत्काळ धाव घेऊन मादी पिल्ले ताब्यात घेतली.
दरम्यान, सदर बिबट्याची पिल्ले मादी प्रकारची असून, त्यांचे वय अंदाजे पंधरा ते तीस दिवसापर्यंत आहे. ती पिल्ले खूप लहान असून मादी शिवाय राहू शकत नसल्याने त्यांना पुन्हा सायंकाळी आहे त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे वन अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.












