- शरद पवार यांची ट्वीटद्वारे माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना करोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचं आणि चाचणी करून घेण्याचं आवाहनही केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.
मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी. शरद पवार ८१ वर्षांचे असून त्यांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.












