न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ३१ जाने.) :- गेल्या अनेक दिवसांपासून कुदळवाडीतील हर्षल कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर महावितरणाचा विद्युत डीपी बॉक्स धोकादायक अवस्थेत उघडा होता.
या परिसरातील नागरिकांची लहान मुले, तसेच मोकाट जनावरे आदींचा या परिसरात वावर असतो. त्यामुळे त्यांच्या जीवितास या उघड्या डीपी बॉक्समुळे धोका होण्याचा संभव होता. याबाबत स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यांना येथील परिस्थिती दाखवली होती व झाकण बसविण्याची सुचना केली होती.
महावितरण अधिकारी विक्रांत वरूडे यांनी या घटनेची दखल घेतली व या डीपी बॉक्सला झाकण बसवले असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.











