न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जाने.) :- पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेच्या वतीने कर आकारणी केली जाते. मालमत्ता करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. परंतु, शास्तीकरामुळे अनेक नागरिक कराचा भरणा करत नाहीत. तसेच शहरातील अनेक अधिकृत, अनधिकृत मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची महापालिकेकडे नोंदणी केली नाही. महापालिकेचा कर बुडविला जातो.
अधिकृत, अनधिकृत अशा ज्या मालमत्तांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली नाही. अशा मालमत्ता धारकांनी करसंकलन कार्यालयाकडे मालमत्तेची नोंदणी करावी. महापालिका शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार आहे. तत्पुर्वी, अनधिकृत, अधिकृत अशा ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेची नोंदणी केली नाही. त्या मालमत्ताधारकांनी येत्या पंधरा दिवसात महापालिकेच्या नजीकच्या करसंकलन कार्यालयाकडे नोंदणीसाठी लेखी अर्ज करावा. महापालिका मालमत्तेची नोंदणी करुन घेईल. पंधरा दिवसाच्या मुदतीनंतर जबरी दंडासह पाडापाडीची कारवाई केली जाईल. असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.











