न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- केंद्र सरकारने आज शुक्रवार (दि. १) रोजी जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने गरीब शेतकऱ्यांना नक्कीच मदत होणार आहे.
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. मात्र, सध्या तोच अडचणीत सापडला होता. सरकारच्या या मदतीमुळे त्याला थोडा दिलासा मिळाला आहे. पूर्वी अडीच लाख नफ्यावर कर भरावा लागत होता. आता पाच लाख निव्वळ नफ्याच्या वर रकमेवर कर द्यावा लागेल. यामुळे मिळकतदारांना मिळकत कर सवलतीत सूट दिल्याने आनंददायी वातावरण असल्याचे, नेत्रतज्ज्ञ डॉ अभिजीत आग्रे यांनी सांगितले आहे.











