न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिकांविरुद्ध अपशब्द वापरले होते. याच्या निषेधार्थ शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी शुक्रवार (दि. १) रोजी वाकड पोलिस स्टेशन येथे कलम १५५ फौजदारी दंडसहीत भादवी कलम ५०० अन्वये माजी खासदार निलेश नारायण राणे यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटील, नवनाथ जाधव, रविकिरण घटकार, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, रोहीदास तांबे, दत्ता गिरी, गणेश पाडुळे, आशिष वाळके, भाग्यश्री मस्के, सारीका ताम्हचिकर, सुनिता खंडाळकर, विशाल बाविस्कर, दिपक कांबळे, प्रदिप दळवी आदी शिवशाही व्यापारीसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.











