न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए) कंपनीच्या एका कामगाराने शुक्रवार (दि. १) रोजी थेरगाव मधील मंगलनगर परिसरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामदास शिवाजीराव उकिरडे (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे.
उकिरडे हे पिंपरी येथील एच. ए कंपनीतील लॅबमध्ये काम करीत होते. गेल्या २० महिन्यांपासून कंपनीकडून पगार न झाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत आत्महत्या केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.