न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले होते. हे चित्र आता बदलले आहे. फेब्रुवारीच्या दुस-या सप्ताहापासून दिवसाला तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सहा हजारापर्यंत खाली आली असून, पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. शहरासाठी ही बाब दिलासादायक आहे.
आज गुरुवारी (दि. १७) रोजी ३०२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३५७८३६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५२४८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६१४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०२ एवढी आहे.












