- आपल्याच पिंपरी चिंचवड शहरात; तोही शिवजयंतीनिमित्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२२) :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आकुर्डीमधील गुरुद्वारा चौक येथील सिद्धेश्वर स्नॅक्स या हॉटेलने सामजिक भान जपत खास ग्राहकांसाठी एका रुपयात चहा आणि पाच रुपयात इडली वडा देण्याची भन्नाट आयडियाची कल्पना आणली आहे.
शनिवारी (दि. १९) रोजी शिवजयंतीनिमित्त हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अगदी स्वस्तात चहा आणि इडली वडा देण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी या हॉटेलला भेट देवून येथील चविशीर पदार्थांवर यथेच्छ ताव मारावा. अधिक माहितीसाठी ७३८७२९४४४० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉटेल मालकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अगदी अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या हॉटेलने ग्राहकांची मने जिंकली आहेत. अगदी भजी, समोसा, वडापावपासून ते मिसळपर्यंत येथे पदार्थांना ग्राहकांची मागणी असते. येथील नाना’ज (Nana’S) चहा पिण्यासाठी तर, अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडते. अगदी राज्यभरात या हॉटेलच्या अनेक शाखा आहेत. तिथेदेखील ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय, अशी माहिती या हॉटेलचे मालक प्रसाद दैतुले यांनी दिली.












