न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२२) :- दिघीतील आळंदी रोडवर मॅक्झिन चौक येथे फिर्यादी आणि इतरांना अश्लील हावभाव करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल, त्रास होईल असे वर्तन महिला आरोपी करत होत्या. तसेच त्यांनी सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले.
गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जय राजेंद्र एडके (वय ३६, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सुरज परखंदे (वय ३६, रा. साडेसतरानळी हडपसर), सारिका रामेश्वर भोसले (वय २३, रा. अक्षयनगर भोसरी), मनीषा संतोष चौधरी (वय ३२ रा. चिखली) यांना वेश्या व्यवसाय प्रकरणी दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.