- बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याचा ठपका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- येथील रुपी को – ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या बँकेच्या माजी संचालकांवर हजार ३२७ कोटी रुपयांएवढ्या रकमेची जबाबदारी यापूर्वीच निश्चित झाली असून, त्यांनी सहकारमंत्र्यांकडे दाखल केलेले अपील फेटाळण्यात आल्यामुळे त्यांच्याकडून रक्कम वसुलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे रुपीच्या अपचारी संचालकांच्या मालमत्तेबाबतीत कोणताही व्यवहार नये, असे आवाहन सहकार विभागाने केलेले आहे.
रुपी बँकेचे वसुली अधिकारी संस्थांचे उपनिबंधक (वर्ग -१) मधुकांत गरड यांनी पत्रकान्वये ही माहिती कळविली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, येथील रुपी को – ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक अनियमितता व गैरव्यवहारापोटी सहकार कायद्यातील कलम ८८ नुसार झालेल्या चौकशीमध्ये बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी व कर्मचा-यांकडून १ हजार ४९० कोटी रुपये वसुलीबाबत तत्कालीन प्राधिकृत अधिका-यांनी २ फेब्रुवारी २०१६ रोजी आदेश दिलेला होता. त्या आदेशाविरुध्द संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यानी राज्याच्या सहकारमंत्र्यांकडे सहकार कायद्याच्या कलम १५२ अन्वये दाखल केलेल्या अपिलांपैकी संचालकांची अपिले फेटाळण्यात आली असून, कलम अन्वये चौकशीचा निवाडा कायम करण्यात आला आहे.
तसेच, या अपिलांमधील यापूर्वी झालेले स्थगिती आदेश उठविण्यात आलेले आहेत व बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. कलम अन्वये चौकशीमध्ये बँकेच्या माजी संचालकांवर १ हजार ३२७ कोटी रुपयांएवढ्या रकमेची जबाबदारी निश्चित केलेली असून, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावयाची आहे. या अपिलांच्या निर्णयामुळे बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तरी सर्व संबंधित व इतरांना फसगत होऊ नये म्हणून रुपी बँकेच्या अपचारी संचालकांच्या मालमत्तेबाबतीत कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये म्हणून जाहीर आवाहन आम्ही करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.