न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज शनिवार (दि. २) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे, अनिल जाधव, डॉ. संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार, शहर प्रवक्ते के. डी. वाघमारे, शहर महासचिव सुहास देशमुख आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार असून, आठरापगड जातींच्या समूहाची एकत्रित मोट बांधून, भाजपचा अश्व रोखणार असल्याचा इशारा, प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी यावेळी दिला आहे.
सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटाबंदीमुळे पंच्चेचाळीस टक्के रोजगार घटला आहे. दिल्ली विधानसभेत ज्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले, त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजप सेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना दुर ठेवून तिस-या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असे सोनोने यांनी सांगितले आहे.
हिंदूस्थान अँन्टीबोयोटिक्स कंपनीतील कामगारांना मागील वीस महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या आर्थिक विवंचनेतून शुक्रवारी रामदास उकीरडे या कामगाराने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एच. ए. व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सांगितले आहे.