- चालकाकडून मालाचा अपहार; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२२) :- भोसरी एमआयडीसीतील चिधू ट्रान्स्पोर्ट येथे आरोपी हा चालक म्हणून कामाला आहे. फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून सतरा हजार ५३० किलो वजनाचा व आठ लाख १५ हजार ५८० रुपये किमतीचा माल भरलेला ट्रक आरोपीच्या ताब्यात दिला.
हा माल कोल्हापुर येथे पोहोच करण्यासाठी पाठविला असता आरोपीने हा ट्रक वाघोली येथे सोडून त्यामधील माल कोठेतरी नेवून त्या मालाचा अपहार केला. याप्रकरणी भारत शिवसिंग राजपूत (रा. आळंदी मरकळ रोड, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सुरेश सीताराम बडगर (वय ४७, रा. चाकण) या चालकावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















