- नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२२) :- प्रभाग क्रमांक १० मधील दत्तनगर विद्यानगर परिसरात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हाडांची ठिसूळता तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर तुषार हिंगे, भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे, अमित गोरखे, संभाजी नाईकनवरे, शुभांगी कसबे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला मंगेश चौधरी, शाम विटकर, अरुण गाडे, सिद्धेश्वर भोसले, राजू विटकर, गणेश लोंढे, राम लोंढे, नितीन शिंदे, भाजपा युवती सरचिटणीस शुभांगी कसबे, अपर्णा अलंकार, चंद्रकांत राऊत आदी उपस्थिती होते
शिबिराचे आयोजन अनुराधा गोरखे यांनी केले. डॉ विष्णु नांदेडकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला नांदेडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. अमोल कुचेकर यांनी आभार मानले.
















