न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडीमधील परिमंडळ कार्यालय अ व ज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील (रेशनकार्ड) ऑनलाईन सेवा (rcms.mahafood.gov.in) शिधापत्रिका व्यवस्थापण प्रणाली पुढील तीन ते चार दिवसांकरीता बंद राहिल.
कार्यालयात शिधापत्रिका कामकाजासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी केले आहे.
















