- निवडणुकीत शिवसेनेला साथ द्या मग बघा प्रभागाचा कायापालट – खा. बारणे..
- शिवजयंतीनिमित्त रस्टन कॉलनी आणि वेताळनगर शाखेत नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- छत्रपती शिवाजी महाराज यांना आपला आदर्श मानणाऱ्या शिवसेनेकडून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाचा अवलंब करण्यात येतो. समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या या पक्षाने सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच आवाज उठविला आहे. शिवसेना सत्तेत असली तरी सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही विरोधकाची भूमिका वेळोवेळी बजावत असतो. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्यासाठी सुरू ठेवलेला लढा आजही कायम आहे. गरजू व वंचित घटकांच्या हाकेला ओ देत धावून जाणं हा शिवसेनेच्या समाजकारणाचा एक भाग आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख अॅड. वैभव थोरात यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त वेताळनगर शाखा आणि चिंचवडमधील रस्टन कॉलनीतील दत्त मंदिर येथे दोन दिवसीय नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या उद्घाटनप्रसंगी अॅड. थोरात बोलत होते. कार्यक्रमास मावळ लोकसभेचे खा. श्रीरंग बारणे, पिंपरी विधानसभेचे मा. आ. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, युवासेना अधिकारी माऊली जगताप, विभाग प्रमुख श्रीमंत गिरी, महेश कलाल, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी तोडकर, मुरलीधर सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुभाष मालुसरे, मयूर जयस्वाल, महादेव सुतार, गणेश ओगले, ऋषिकेश प्रभू, सुमित कांबळे, सागर चौरे, संतोष मोरजकर, मारुती केवळे, कुमार सुतार, कलावती नाटेकर, आशा शिंदे, शिवसैनिक व मोठ्या संख्येने वार्डातील नागरिक उपस्थित होते.
खा. बारणे म्हणाले, गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख आहेच परंतु, आता राज्यात मुख्यमंत्रीही शिवसेनेचे असल्यामुळे पक्षाला एक वेगळे स्थान आहे. शिवसेनेच्या जडणघडणीत शिवसैनिक व त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या मतदारांचाही मोठा वाटा आहे. यंदा महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ द्या अनं मग बघा प्रभागाचा कसा कायापालट करतो ते.
शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी उपक्रमाचे कौतुक केले. सामजिक बाबतीत देखील पक्ष नेहमीच एक हात मदतीचा पुढे करीत असतो. तिथीनुसार होणारी शिवजयंती आणखी भव्य दिव्य स्वरुपात साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक राजेश आरसूळ म्हणाले, नेत्र शिबिरात तब्बल सहाशे जणांनी भाग घेतला. तपासणी झालेल्या रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. मोतीबिंदू निदान झालेल्या नागरिकांवर देखील लवकरच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पीबीएमए देसाई हॉस्पिटल पुणे, मिशन फोर विजन देहूरोड येथील वानखेडे रुग्णालयाचे डॉ. गणेश शिंदे व त्यांच्या टीमने शिबिरासाठी सहकार्य केले.
शिवसेना जिल्हा संघटिका वैशालीताई मराठे, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, वेताळनगर शाखेचे मजीद शेख, महेश शर्मा, कुदरत खान, सुग्रीव आडागळे, किशोर सातपुते, मुस्तफा शेख, आशा सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
















