- भाजप नगरसेविका चंदा लोखंडे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या कट्टर समर्थक भाजपा नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती चंदा लोखंडे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे आज सोमवारी (दि. २१) रोजी सुपूर्द केला आहे.
आयुक्तांना दिलेल्या राजीनामा पत्रात ”मी चंदा राजू लोखंडे भाजप पक्षाच्या तिकीटावर प्रभाग क्रमांक २९ ‘ ड ‘ मधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१७ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये निवडून आलेली आहे. आज दिनांक २१/०२/२०२२ रोजी मी माझ्या वैयक्तीक कारणामुळे नगरसदस्यपदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारण्यात यावा”, असे त्यांनी म्हटले आहे.
चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागेच प्रवेश केला होता. त्यामुळे त्याही आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक समजते.
















