- रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाटसरूंची भागणार तहान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 21 फेब्रुवारी 2022) :- फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची गरज भासत आहे. पिंपळे सौदागर परिसरात पूर्वी रस्त्यावर ठिक-ठिकाणी पाणपोई उभारल्या जात होत्या. परंतु ऐन हिवाळ्यातच उन्हाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे पाण्यावाचून खूप हाल होत आहेत.
नागरिकांची हीच गरज ओळखून पिंपळे सौदागर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिताताई काटे यांच्या हस्ते पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल चौकात रविवारी (दि. २०) रोजी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
दिवसभरात साधारण सकाळपासून ते सायंकाळपर्यंत नागरिकांना थंड पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे. या सेवेचा प्रभागातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अनिताताई काटे यांनी केले आहे.
















