- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथे फिर्यादीने कार्यालयासमोर रविवारी रात्री (दि. २०) रोजी त्यांची गाडी पार्क केली होती. रात्री अकराच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले.
त्यातील एकाने कारच्या समोरील बाजूला आणि एकाने कारच्या मागील बाजूला दगड मारून कारचे नुकसान केले. त्यानंतर दोघेजण दुचाकीवरून निघून गेले.
अमित उर्फ साई प्रदीप वाघमारे (वय ३५, रा. मोशी प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा संघटक आहेत.












