- आरोपीला पोलिसांकडून बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- तडीपारीच्या आदेशाचा भंग करून कालावधी संपण्यापूर्वी पोलिसांची परवानगी न घेता आरोपी शहरात आला होता. माहिती मिळताच आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस गेले. आरोपीने पोलीस शिपाई यांना धक्काबुक्की केली. दोन्ही हाताने ढकलून ‘ मला कोण पकडते ‘ , असे म्हणत आरडाओरडा करून सरकारी कामात अडथळा आणला.
रविवारी (दि. २०) रोजी रात्री सव्वादहाच्या दरम्यान वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे हा प्रसंग घडला. पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वीरेन्द्र उर्फ बेद्या भोलेनाथ सोनी (वय २३, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी आरोपीला तडीपार करण्यात आले होते. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.












