न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमिती करणाच्या अर्जास मुदतवाढ दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका हद्दीतील दि. ३१/१२/२०२० पुर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम २००१ यात सुधारणा करुन अधिनियम दि. १२ मार्च २०२१ रोजी पारित केला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दि. ३१/१२/२०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी दि. १६/१२/२०२१ अन्वये मा. आयुक्त यांनी जाहिर प्रकटन मंजुर केलेले आहे.
त्यानुसार दि. २०/१२/ २०२१ ते दि. २१/२/२०२२ पर्यंत विहित कागदपत्रासह अर्ज स्वीकृतीस मुदत देण्यात आलेली होती. या गुंठेवारीची योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अर्ज स्विकृतीची मुदत दि. २०/४/२०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.












