- राजभवनात होणार राज्यपालंच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- नोव्हेल इन्स्टिट्युटस् चे अध्यक्ष अमित गोरखे यांना कर्तव्यम सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.
अमित गोरखे यांनी कोरोना काळात केलेली मदत, नोव्हेल शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत केलेले काम तसेच कलारंग सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून आजवर सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान या कामासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात.
राजकारण बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी नेहमी ते धावून जातात. महाराष्ट्रभर त्यांचे काम जोमाने सुरू आहे. ते भाजपाचे प्रदेश सचिव आहेत. याआधी २०१२ साली भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. या पुरस्काराचे वितरण राजभवन महाराष्ट्र राज्य येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते मंगळवार (दि. २२) रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती संयोजन तथा निवड समिती यांनी दिली आहे.












