- थकबाकी भरणा न केलेल्या मालमत्ता पालिकेकडून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. धनबाकीदारांची करवसूली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत ४२९.३८ कोटी मालमत्ताकराची वसूली झाली आहे.
१८ करसंकलन विभागीय कार्यालयातील वसूली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा देण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली, अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. थकबाकी भरणा न केल्याने मालमत्ता सील केल्या आहेत.
अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्याची नागरिकांना सुविधा देण्यात आली आहे. त्वरीत मालमत्ता कर भरणा करून पाणी पुरवठा खंडीत होणे, मालमत्ता सील होणे यासारखी कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त यांनी पत्रकाद्वारे केले आहे.