- चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळाकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- आपल्याकडे एखादी व्यक्ती वाईट नजरेने पाहत असेल किंवा वाईट भावनेने स्पर्श करीत असेल महिलांनी त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून त्या नराधमास चूक करण्यास प्रोत्साहन देऊ नये. उलट जोरात आरडाओरडा करून अन्यायाचा प्रतिकार करा. अशा शब्दांत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिलांना स्वरक्षणाचा कानमंत्र दिला.
चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उडाण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी करोना काळात कार्य केलेले डॉक्टर, नर्सेस, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी समाजसेवक यांना उडाण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी औद्योगिक शिक्षण मंडळाच्या संचालिका डॉ. प्रीती पाचपांडे, आदित्य पाचपांडे, आयआयबीआरचे डॉ. एस. बी. माथूर, आयपीएस कॅंपसचे संचालक डॉ सुधाकर बोकेफोडे, सीएस आयटी कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ.दत्तात्रय बाळसराफ, गीतामाता इंग्लिश मीडियम शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनाक्षी सूर्यवंशी यांनी केले. तर सूत्रसंचालन विजया यमगर व लेखराज पाठक यांनी केले. तरन्नुम शेख यांनी आभार मानले.