- चायनात लॉकडाऊन; अजितदादांचा पुन्हा राज्यात लॉकडाऊनचा इशारा?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२२) :- मागील वर्षी करोनाचे संकट असतानादेखील विकासकामांना गती देण्याचे काम केले आहे. आता करोना कमी झालाय पण गेलेला नाही. इथं तर पठ्ठ्यानी मास्कच काढून टाकलेला आहे. आहो चायनामध्ये काल परवा लॉक डाऊन करण्याची वेळ आली आहे. करोनाला एवढ लाईटली घेऊ नका, बाबांनो. आमच्यातील एका मंत्र्यांला दोन महिन्यामध्ये तीनदा करोना झाला होता,” असं मंत्र्याचं नाव न घेता अजित पवार म्हणाले.
तसेच “तुम्ही मला दोन वर्षात एकदा तरी विनामास्क पाहिले का? फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क काढतो आणि झोपताना तेवढा मास्क काढतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार कात्रज येथील कार्यक्रमात भाषण करताना म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, या भावनेतून मास्क काढत नसल्याचं अजित पवार म्हणाले.
सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, आपण सर्वांनी करोना काळात मास्क न घालण्याची आणि काळजी न घेण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे. अनेक जीवा-भावाची माणसं सोडून गेलीत, त्यामुळे काळजी घ्या”, असं अजित पवार म्हणाले.
















