न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना प्रोत्साहनात्मक भत्ता म्हणून मुशाहिरा (बक्षिस) योजना राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज मंगळवार (दि. ५) रोजी स्थायी समितीच्या सभेत आयत्यावेळी मंजुरी देण्यात आली.
शहरातील कर आकारणी न झालेल्या निवासी, बिगरनिवासी मिळकतींची मालमत्ताधरकांचे नाव, संपूर्ण पत्त्यासह सविस्तर माहिती महापालिकेला द्यावी. याबाबतची माहिती देणा-या नागरिकाला मुशाहिरा म्हणून मिळकतीच्या सामान्य करात १० टक्के सवलत दिली जाणार आहे, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे.











