- स्वहिस्सा रक्कम मुदतीत भरा अन्यथा लाभ रद्द होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- केंद्र, राज्य आणि पालिकेच्या सहकार्याने चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. चऱ्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुढील ४० टक्के आणि बो-हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना ८० टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यास पालिकेने कळविले आहे.
दरम्यान पात्र लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यास आयुक्त / तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दि. १५ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत लाभार्थ्यांनी आपली स्वहिस्सा रकम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करुन दि. १५/०४/२०२२ पर्यंत स्वहिस्सा रक्कम भरावी. अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या बाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २०५ व्यापारी संकुलन, भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव, पुणे ३३ या कार्यालयाच्या दर्शनी भागावर सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे.












