न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२२) :- कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. NTAGI ने याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
सध्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जातो. आता हे अंतर आणखी कमी केल्यास करोना लसीकरणालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.