न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२२) :- बारावी वर्गात वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकणारे सहा मित्र बारावीच्या परिक्षेचा पेपर देऊन कासारसाई धरणावरती फिरायला आले होते. हे मित्र पाण्यामध्ये उतरले असता त्यापैकी दोघांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.
आरिष घोगी ( वय १७, रा. सोमाटणे फाटा) व विनय किसन कडू (वय 17, रा. निगडी, मुळगाव येळसे ता. मावळ) या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी (दि. २१) रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
शिरगाव पोलीसांसह वन्यजीव रक्षक टिमने दोन तास अथक प्रयत्न करुन मृतदेह पाण्याबाहेर काढले. पुढील तपास शिरगाव परदंवडी पोलीस करित आहेत.












