न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे चिंचवड येथील मालधक्क्याजवळ कार्यालय आहे. या कार्यालयात फिर्यादी लेखापाल म्हणून नोकरीस आहेत.
पगाराची सर्व रक्कम का दिली नाही, या कारणावरून माथाडी कामगारांनी १४ फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास बेकायदेशीर जमाव करून आंदोलन करणार आहे याची पूर्वकल्पना दिली नाही. स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास धोका होईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
१४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. संजय दामोदर जोशी (वय ५८, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २१) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मंगेश काटे, बाबा कांडर व इतर २० ते २५ माथाडी कामगार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.












