- शहरातील या मार्गावरून धावणार बस…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड येथील मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलकडून पूरक सेवा देण्याची सोमवारपासून सुरुवात झाली. पुण्यामध्ये दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणांहून वर्तुळाकार मार्गावरून ही सेवा कार्यरत राहणार आहे.
या बससेवेमुळे नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. या सेवेसाठी मिडी बसचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. या सर्व मार्गावर बसच्या वीस फेऱ्या होणार असून दोन फेऱ्यांदरम्यान ४० मिनिटांची वारंवारिता असेल. बसला हिरवा झेंडा दाखवून पूरक सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
पूरक सेवेचे मार्ग
- मार्ग क्र. १ : पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानक, गांधीनगर, एच. ए. कॉर्नर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, टेल्को कंपनी, के. एस. बी. चौक, पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानक
- मार्ग क्र. २ : संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक, वल्लभनगर एसटी स्थानक, फुलेनगर, एमआयडीसी कॉर्नर, पिंपरी डेपो, नेहरुनगर कॉर्नर, डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरी, संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक
- मार्ग क्र. ३ : नाशिक फाटा भोसरी मेट्रो स्थानक, सी. आय. आर. टी., एमआयडीसी कॉर्नर, फिलीप्स कंपनी, इलेक्ट्कि भवन, क प्रभाग कार्यालय, ज्योती इंग्लिश स्कूल, नेहरुनगर कॉर्नर, वाय. सी. एम. हॉस्पिटल, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा भोसरी मेट्रो स्थानक
- मार्ग क्र. ४ : फुगेवाडी मेट्रो स्थानक, मार्शल कंपनी, कासारवाडी, कासारवाडी रेल्वे स्थानक, दत्त मंदिर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव मनपा शाळा, काटेपूरम चौक, शितळादेवी चौक, सीएनजी पंप, फुगेवाडी मेट्रो स्थानक












