न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२२) :- डूडूळगाव येथील नव्याने सुरु असलेल्या व EWS आरक्षण मधील अनधिकृत बांधकामांवर आज बुधवारी (दि. २३) महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत निष्कसनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये एकूण १४ अनधिकृत बांधकामे / आर.सी.सी. / वीट बांधकाम व पत्राशेड असे एकुण क्षेत्रफळ अंदाजे १२०७०.०० चौ. फुट पाडण्यात आली आहेत.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त जितेन्द्र वाघ, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता संजय घुबे, उप अभियंता हेमंत देसाई, उप अभियंता सुर्यकांत मोहिते यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण पथक. एम.एस.एफ. जवान ५४, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (दिघी पोलिस स्टेशन) पोलीस उपनिरीक्षक ०१ पोलिस पुरुष १० पोलिस महिला ५, मजूर २०, जेसीबी ३, ब्रेकर १, पोकलेन १.,डंपर २ च्या सहाय्याने करण्यात आली.












