- हेल्पलाईन क्रमांक जारी; पाणी जपून वापरण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी, व्हॉल्व लिकेज, पाईपलाईन फुटणे इ. प्रकारच्या तक्रारी विभागास प्राप्त होत आहे. पाण्याच्या तक्रारी त्वरीत सोडविणेसाठी पालिकेमार्फत २४x७ स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणेत आली आहे. त्यासाठी ७७२२०६०९९९ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यांत आलेला आहे.
पाण्यासंदर्भात आपल्या काही तक्रारी असतील त्या ७७२२०६०९९९ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. तसेच उपलब्ध पाणी जपून वापरावे. घरातील, इमारतींमधील, सोसायट्यांच्या आवारातील पाण्याची गळती (Leakages) बंद करावी.
पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. तसेच रस्त्यावरील दृष्टीक्षेपातील पाणी गळतीबाबत महानगरपालिकेस कळवावे, असे आवाहन पालिकेने नागरिकांना पत्रकाद्वारे केले आहे.












