- जबरदस्तीने रिक्षात ओढले; दिघीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२२) :- वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रीतीने आरोपीने रिक्षा (एमएच १४ / एच एम ३७७१) चालवली. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना समज दिली. पोलिसाचे न ऐकता आरोपी पुढे निघून गेले.
भारतमाता चौकात रिक्षा थांबली असता आरोपींनी फिर्यादीशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी पोलीस महिलेला रिक्षात ओढून रिक्षा तशीच पुढे पळवून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मंगळवारी (दि. २२) रात्री सव्वानऊ वाजता भारतमाता चौक, मोशी येथे घडली.
पिडीत पोलीस महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विदीप भरत मादलापुरे (वय १९), अभिषेक बाळासाहेब पोळ (वय १९), सुनील शिवाजी कसबे (वय २०, रा. बनकरवस्ती, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












